स्व.लोकनेते बाळासाहेब देसाई.

          महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाईसाहेब कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य घराण्यामध्ये जन्माला आले असले तरी, महाराष्ट्राला नवी राजकीय दिशा दाखविण्याचे धडाडीचे काम लोकनेते साहेबांनी त्यांच्या काळात केले होते. लोकनेत्यांच्या कामांच्या पध्दतीचा संपूर्ण राज्यावर प्रभाव होता. त्यांनी राबविलेले अनेक उपक्रम आजही राज्यातील अनेक कार्यकर्त्याच्या मनात कोरलेले आहेत. सर्वसामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जनतेच्या अडचणी, त्यांचे प्रश्न जागेवर सोडविताना ते त्वरित याबाबत निर्णय देत असत. लोकनेत्यांनी दिलेला निर्णय आदी आणि मग मंत्रालयातून याबाबतचा निर्णय निघत असे. हे अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. लोकनेत्यांच्या अनुभवाची समृध्द अशी शिदोरी तसेच प्रशासनावर त्यांची भक्कम पकड व दरारा होता. लोकनेत्यांच स्वत:च कर्तुत्वच इतकं मोठ की,ते ज्या सत्तेच्या खुर्चीवरती बसलेले असत त्या खुर्च्यासुध्दा खुज्या वाटत असे. संस्था आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेताना ते निर्णय लाल फितीमध्ये कधी त्यांनी अडकवू दिले नाहीत.


         सतत सामान्य माणसाला न्याय मिळून त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस येतील हा विचार केंद्रस्थानी ठेवून काम केले. लोकनेत्यांचे कार्यच असामान्य दर्जाचे होते की त्यांच्या काळात वैभवशाली पाटण तालुक्याची निर्मिती पूर्णत्वास आली होती. समाजकारणातून त्यांनी राजकारण करीत तालुक्याच्या विकासकार्याचा पाया भक्कम केला होता.


         महाराष्ट्राचे पोलादी पुरुष व पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते आदरणीय बाळासाहेब देसाई व स्वर्गीय आबासाहेब यांचा राजकीय काळ हा पाटण तालुक्याचा सुवर्णकाळ म्हणून तालुक्याचा सुवर्णकाळ म्हणून तालुक्याच्या इतिहासात नोंदला तर गेलाच असून लोकनेतेसाहेबांच्या आणि आबासाहेबांच्या महान कार्याने संपूर्ण महाराष्ट्र भारावून गेला होता हे सत्य कुणीही नाकारत नाही.